Common Wealth Games 2022: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 62 किलो गटात Sakshi Malik ने जिंकले सुवर्णपदक

साक्षीने अंतिम फेरीत कॅनडाच्या अॅना गोन्झालेझचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील साक्षीचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

Sakshi Malik (संग्रहित संपादित प्रतिमा)

साक्षी मलिकने शुक्रवारी बर्मिंगहॅम येथे खेळल्या जात असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 62 किलो गटात सुवर्णपदक जिंकले. साक्षीने अंतिम फेरीत कॅनडाच्या अॅना गोन्झालेझचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील साक्षीचे हे पहिले सुवर्णपदक आहे. ग्लासगो 2014 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षीने रौप्यपदक जिंकले होते. 2018 मध्ये साक्षीने गोल्ड कोस्टमध्ये कांस्यपदक जिंकले होते. यापूर्वी भारताच्या बजरंग पुनियाने आश्चर्यकारक कामगिरी केली होती. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या कुस्तीपटूला हरवून सुवर्णपदक जिंकले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement