Ind vs Aus WTC Final 2023: अंतिम सामन्याच्या पुर्वी टीम इंडियाला धक्का, संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त
ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघा दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान पार पडणार आहे.
ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघा दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2023) स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान पार पडणार आहे. पंरतू या सामन्यापुर्वी टीम इंडियाला (Team India) धक्का बसला आहे. झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) सराव करत असताना दुखापतग्रस्त झाल्याची बातमी समोर येत आहे. रविवारी जेव्हा भारतीय खेळाडू नेट्समध्ये सराव करत होते, त्यावेळी अनिकेत चौधरीच्या चेंडूवर तो दुखापतग्रस्त झाला आहे. मात्र या बाबत बिसीसीआयकडून अद्याप कोणती अधिकृत माहिती मिळाली नाही.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)