Yashasvi Jaiswal New Record: यशस्वी जैस्वालने एका चेंडूवर केल्या 13 धावा, अशी कामगिरी करणारा ठरला जगातील एकमेव फलंदाज
या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने 13 धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
IND vs ZIM 5th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील टी-20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना हरारे येथे खेळवला गेला. पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर त्याने 13 धावा केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तोच पहिला षटक टाकायला आला होता. पहिल्याच चेंडूवर रझाने नो-बॉल टाकला होता आणि यशस्वीने षटकार ठोकला होता. यासह त्याने एकही चेंडू न खेळता 7 धावा केल्या होत्या. पुढच्याच चेंडूवर त्याने पुन्हा षटकार ठोकला. यासह यशस्वीने एकाच चेंडूवर 13 धावा केल्या.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)