World Cup 2023: विश्वचषकातील पराभवानंतर भावूक झाला Virat Kohli; पत्नी Anushka Sharma ने मिठी मारून केले सांत्वन (See Photo)

विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर विराट कोहली खूप निराश आणि हताश झाला होता. हे दुःख घेऊन जेव्हा तो पत्नी अनुष्का शर्माकडे पोहोचला तेव्हा तिने त्याचे सांत्वन करण्यासाठी विराटला मिठी मारली.

Virat Kohli, Anushka Sharma

विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाच्या पराभवानंतर चाहत्यांसह भारतीय सेलेब्सही खूप निराश दिसले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना पाहण्यासाठी पोहोचलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ ऑनलाइन समोर आला आहे, ज्यामध्ये त्या दोघीही खूप निराश दिसत होत्या. विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर विराट कोहली खूप निराश आणि हताश झाला होता. हे दुःख घेऊन जेव्हा तो पत्नी अनुष्का शर्माकडे पोहोचला तेव्हा तिने त्याचे सांत्वन करण्यासाठी विराटला मिठी मारली. विराट आणि अनुष्काचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसीच्या अफवा पसरत आहेत. अभिनेत्री आणि तिचा क्रिकेटर पती विराट कोहली वामिकानंतर दुसऱ्या अपत्याची प्रतीक्षा करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात आज विश्वचषक 2023 साठी टीम इंडिया आणि तिचा पती विराट कोहलीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का अहमदाबादमध्ये होती. (हेही वाचा: IND vs AUS, World Cup Final: पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांनी पॅट कमिन्सला दिली वर्ल्ड कप ट्रॉफी, कांगारू सहाव्यांदा बनला विश्वविजेता)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement