Women's World Cup 2022: गतविजेता इंग्लंडची दयनीय अवस्था, विश्वचषकातून बाहेर पाडण्याचे ओढवले संकट; दक्षिण आफ्रिका महिलांचा सलग तिसरा विजय
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 49.2 षटकांत 7 बाद 236 धावा करून विजयाची नोंद केली.
Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील 13 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) इंग्लंडचा (England) 3 गडी राखून पराभव करून आपला विजयरथ सुरूच ठेवला. प्रथम फलंदाजी करून इंग्लंडने 50 षटकांत 235/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात Proteas महिलांनी 49.2 षटकांत लक्ष्य गाठून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. तसेच आयसीसी महिला विश्वचषकात आपल्या सलग तिसऱ्या पराभवसह गतविजेता इंग्लंडवर लवकर स्पर्धेबाहेर पाडण्याचे संकट ओढवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)