WI vs SA Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध Keshav Maharaj ने रचला इतिहास, कसोटी हॅटट्रिक घेणार ठरला दक्षिण आफ्रिकेचा दुसरा खेळाडू

महाराजने विंडीजच्या कीरन पॉवेल, जेसन होल्डर, जोशुआ डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूत बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक पूर्ण केली असून अशी कमाल करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

केशव महाराज (Photo Credit: Getty)

WI vs SA 1st Test 2021: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकीपटू केशव महाराजने (Keshav Maharasj) हॅट्रिक घेतली आहे. महाराजने विंडीजच्या कीरन पॉवेल, जेसन होल्डर (Jason Holder), जोशुआ डा सिल्वा यांना सलग तीन चेंडूत बाद करत कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक पूर्ण केली असून अशी कमाल करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी जेफ्री ग्रिफिन (Geoffrey Griffin) यांनी 1960 मध्ये लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध संघासाठी पहिली हॅट्रिक घेतली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)