WI vs ENG Women's World Cup 2022: वेस्ट इंडिजचा निसटता विजय, Anisa Mohammed हिने पालटवली बाजी; गतविजेता इंग्लंड 7 धावांनी पराभूत

आयसीसी महिला विश्वचषकच्या 7 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करत रोमांचक विजयाची नोंद केली. न्यूझीलंड पाठोपाठ आता कॅरेबियन संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे.अनिसा मोहम्मद विंडीज संघाच्या विजयची शिल्पकार ठरली. निर्णायक क्षणी इंग्लंड विजयाच्या जवळ पोहोचला असताना अनिसाने केट क्रॉसला आणि अन्या श्रबसोल यांना बाद करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs ENG Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या (ICC Women's World Cup) 7 व्या सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाने इंग्लंडचा (England) सात धावांनी पराभव करत रोमांचक विजयाची नोंद केली. न्यूझीलंड पाठोपाठ आता कॅरेबियन संघाने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली आहे. या सामन्यात विंडीजच्या 225 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लिश महिला संघ 47.8 षटकात 218 धावांवर गारद झाला आणि सात धावांनी सामना गमावला. अनिसा मोहम्मद (Anisa Mohammed) विंडीज संघाच्या विजयची शिल्पकार ठरली. अंतिम षटकात इंग्लंड संघ विजयाच्या जवळ पोहोचला असताना अनिसाने केट क्रॉसला रनआउट आणि अन्या श्रबसोल हिला स्टंप आऊट करून संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now