WI vs AUS 4th T20I: मिचेल मार्श याचा ऑलराउंडर शो, वेस्ट इंडिजवर 4 धावांनी मात करून मालिकेत ऑस्ट्रेलियाने मिळवला पहिला विजय

WI vs AUS 4th T20I 2021: वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा टी-20 सामना सेंट लुईस येथे खेळला गेला, ज्यामध्ये कांगारू संघाने मिचेल मार्शच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 4 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाचा टी-20 मालिकेतील हा पहिला विजय ठरला. वेस्ट इंडीजने यापूर्वी ही 5 सामन्यांची टी -20 मालिका जिंकली आहे.

मिचेल मार्श (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs AUS 4th T20I 2021: वेस्ट इंडीज (West Indies) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात चौथा टी-20 सामना सेंट लुईस येथे खेळला गेला, ज्यामध्ये कांगारू संघाने मिचेल मार्शच्या  (Mitchell Marsh) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 4 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाचा टी-20 मालिकेतील हा पहिला विजय ठरला. मार्शने पहिले 75 धावा केल्या तर नंतर चेंडूने 24 धावा देत 3 विकेट्स काढल्या. मार्शच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने 189 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात विंडीज संघ 185 धावाच करू शकला. वेस्ट इंडीजने यापूर्वी ही 5 सामन्यांची टी -20 मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आता सन्मानाची लढाई लढत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement