RR vs KKR, IPL 2024 70th Match Live Update: सामना वाहून गेला तर काय होईल? कोणाचे होणार नुकसान, कोणत्या संघाला होणार फायदा

आयपीएलचा हा शेवटचा लीग सामना नेटनेटरेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते.

RR vs KKR, IPL 2024: आज, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (RR vs KKR) यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 70 वा सामना पावसामुळे सुरू होऊ शकला नाही. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे या सामन्यात नाणेफेक अद्याप होऊ शकलेली नाही. आयपीएलचा हा शेवटचा लीग सामना नेटनेटरेटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचू शकते. या सामन्यातील विजय किंवा पराभवाने कोलकाता नाईट रायडर्सला काही फरक पडणार नाही. हा सामना पावसाने वाहून गेल्यास राजस्थान रॉयल्सचे नुकसान होईल. राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहील. तर सामना जिंकून नंबर-2 वर येण्याची संधी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)