IND vs WI 2nd Test Day 3 Live Score Update: वेस्ट इंडिज संघाची तिसरी विकेट पडली, सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट 75 धावा करून बाद
पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला तिसरा मोठा धक्का बसला. सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट 75 धावा करून आर अश्विनचा बळी ठरला. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या 157/3.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने पहिला सामना एक डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडिजने 41 षटकांत एक गडी गमावून 86 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाचा डाव 128 षटकांत 473 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून स्टार फलंदाज विराट कोहलीने सर्वाधिक 121 धावा केल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला तिसरा मोठा धक्का बसला. सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट 75 धावा करून आर अश्विनचा बळी ठरला. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या 157/3.