IPL 2023 मधून बाहेर पडल्यानंतर Virat Kohli ने एक भावनिक पोस्ट केली शेअर, चाहत्यांचे मानले आभार
गुजरातविरुद्धही शतक ठोकले, पण संघाला विजय मिळवता आला नाही. प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीने आपल्या चाहत्यांचे भावूकपणे आभार मानले आहेत.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येही आरसीबी (RCB) संघ चमत्कार करू शकला नाही. चषक जिंकण्याची प्रतीक्षा 16 वर्षांपासून सुरू आहे. या मोसमात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना हरल्याने विराट कोहलीचे (Virat Kohli) स्वप्न पुन्हा एकदा संपुष्टात आले. विराट कोहलीने सर्वतोपरी प्रयत्न केले. गुजरातविरुद्धही शतक ठोकले, पण संघाला विजय मिळवता आला नाही. प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीने आपल्या चाहत्यांचे भावूकपणे आभार मानले आहेत. विराट कोहलीने सोशल मीडियावर लिहिले की, 'या मोसमातही खूप चांगले क्षण आले पण संघाने आपले लक्ष्य चुकवले, अपयशामुळे निराश झालो, परंतु आपण आपले डोके नेहमी उंच ठेवले पाहिजे, प्रत्येक पावलावर आम्हाला साथ देणाऱ्या आमच्या निष्ठावंत समर्थकांचे आभार.'
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)