Virat Kohli Century: विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात झळकावले शतक, आरसीबी गुजरातविरुद्ध मोठ्या धावसंख्येच्या दिशेने
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs GT) गुजरात टायटन्सचा सामना करत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.
RCB vs GT Live Score Update: आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील 70 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs GT) गुजरात टायटन्सचा सामना करत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर आहे. त्याने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. गुजरातला हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे आरसीबीची नजर असेल. दरम्यान प्रथम फलंदांजी करताना आरसीबीचे पाच विकेट पडले आहे. तर एक हाती झुंज सुरु ठेवुन विराट कोहलीने आपले शतर पुर्ण केले आहे. आरसीबीचा स्कोर 182/5
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)