Virat Kohli Century: विराट कोहलीने खेळली धडाकेबाज खेळी, अवघ्या 61 चेंडूत झळकावले धडाकेबाज शतक
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबाद संघासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे संघ आतापर्यंत 21 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने 12 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 9 सामने जिंकले आहेत. एकूणच हेड टू हेडमध्ये सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर आघाडी घेतली आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 186 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 104 धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून मायकेल ब्रेसवेलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला 20 षटकात 187 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर विराट कोहलीने 61 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सांघिक स्कोअर 178/2 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)