Surya Kumar Yadav ची शतकीय खेळी पाहून Virat Kohli ने केला हा खास मसेज, ड्रेसिंग रूमच्या आतून मिळाले हे खास उत्तर (Watch Video)
IND vs SL: सूर्यकुमार यादवने (Surya Kumar Yadav) श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला (Team India) मालिका विजय मिळवून दिला. सूर्याने आपल्या डावात केवळ 51 चेंडूत 112 धावा ठोकल्या. राजकोटच्या मैदानावर फक्त सूर्यकुमारचीच फलंदाजी पाहायला मिळाली. आपल्या खेळीत या फलंदाजाने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटूंपर्यंत सूर्याच्या खेळीचे कौतुक केले जात आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) सूर्याची खेळी पाहून त्याचे कौतुक केले आहे. कोहलीने इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्याचे कौतुक केले. उत्तरात सूर्याने लिहिले की, भाऊ, खूप प्रेम, लवकरच भेटू. बीसीसीआयने (BCCI) हा व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये सूर्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचताच प्रथम त्याचा मोबाइल चेक करतो.
पहा व्हिडीओ