Virat Kohli Complete 6000 Runs In India In ODI: विराट कोहलीने वाढदिवशी चाहत्यांना दिली मोठी भेट, घरच्या भूमीवर 6000 वनडे धावा केल्या पूर्ण
अशी कामगिरी करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज (119 सामने) ठरला आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना खेळला जात आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली आहे. पण तरीही टीम इंडियाच्या नजरा विजयावर असतील. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पण भारतीय गोलंदाजांसाठी ते थोडे कठीण जाईल. टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले असून त्यांचे खेळाडूही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियालाही कडव्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अनुभवी फलंदाज विराट कोहलीने आणखी एक कामगिरी केली. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाविरुद्ध 55 धावा करत विराटने भारतातील वनडेमध्ये 6,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज (119 सामने) ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 164 सामन्यांच्या 160 डावांमध्ये 6,976 धावा केल्या होत्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)