Virat Kohli New Record: विराट कोहलीने उपांत्य फेरी सामन्यात नावावर केला नवीन विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे
संघाचा सर्वात मोठा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) उपांत्य फेरीच्या सामन्यात इतिहास रचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतासाठी 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. मात्र आता विराट कोहली सचिनच्या पुढे गेला आहे.
भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात एकदिवसीय विश्वचषक 2023 चा (ICC World Cup 2023) उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर संघाचा सर्वात मोठा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) उपांत्य फेरीच्या सामन्यात इतिहास रचला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) भारतासाठी 1996, 2003 आणि 2011 च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली होती. मात्र आता विराट कोहली सचिनच्या पुढे गेला आहे. विराट कोहली चौथ्यांदा वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. विराटने भारतासाठी 2011, 2015 आणि 2019 मध्ये गेल्या तीन विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीचे सामने खेळले होते. आता चार सेमीफायनल खेळणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. (हे देखील वाचा: Shubman Gill Half-Century: भारताची धावसंख्या एका विकेटवर 100 धावा पार, शुभमन गिलचे अर्धशतक)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)