Mohammad Siraj ला विकेट मिळताच Virat Kohli आणि Rohit Sharma झाले खूश, एकमेकांना मारली मिठी, पाहा व्हिडिओ

सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेकांना अतिशय प्रेमाने मिठी मारताना दिसले. हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा विराटने मोहम्मद सिराजकडे बोट दाखवून त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले...

IND vs SA 2nd Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसरी कसोटी सामना (बुधवार) पासून न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेकांना अतिशय प्रेमाने मिठी मारताना दिसले. हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा विराटने मोहम्मद सिराजकडे बोट दाखवून त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले, त्याच्या मास्टर प्लॅननुसार गोलंदाजी करत सिराजने पुढच्याच चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर कोहली आणि रोहित एकमेकांकडे धावले. मोहम्मद सिराजने या सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli's Super Plan To Siraj: विराट कोहलीच्या मास्टर प्लॅनमुळे मोहम्मद सिराजला मिळाली विकेट, पुढच्याच चेंडूवर मार्को जॅन्सन झाला बाद, पाहा व्हिडिओ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now