Rohit Sharma Final Match Record: कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली रोहित शर्माने पहिल्यांदाच गमावला विजेतेपदाचा सामना, असा आहे 'हिटमॅन'चा विक्रम
दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत (Australia Beat India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळला गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा धावांनी पराभव करत (Australia Beat India) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्राचे विजेतेपद पटकावले. मॅचच्या पाचव्या दिवशी टीम इंडिया उरलेल्या 280 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण टीम 63.3 ओव्हरमध्ये 234 रन्सवर गारद झाली. दरम्यान, रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याच्या नेतृत्वाखालील पहिल्या विजेतेपदाचा सामना गमावला आहे. 2013 मध्ये रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले होते. (हे देखील वाचा: Rohit Sharma New Record: कर्णधार रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रचला इतिहास, सचिन तेंडुलकरला या बाबतीत टाकले मागे)
- Rohit won the IPL final in 2013.
- Rohit won the CLT20 final in 2013.
- Rohit won the IPL final in 2015.
- Rohit won the IPL final in 2017.
- Rohit won the Asia Cup final in 2018.
- Rohit won the Nidahas final in 2018.
- Rohit won the IPL final in 2019.
- Rohit won the IPL final in 2020.
- Rohit lost the WTC final in 2023.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)