ENG vs AUS 1st T20I 2024: 4,4,6,6,6,4... ट्रॅव्हिस हेडचा डोक्याला शाॅट, सॅम कुरनच्या एका षटकात ठोकल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेडने त्यांचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या सॅम कुरनच्या एका षटकात हेडने कहर केला.

TRavis Head (Photo Credit - X)

Travis Head Batting: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ट्रॅव्हिस हेडनने (Travis Head) रविवारी साउथहॅम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यादरम्यान पॉवर हिटिंगचे शानदार प्रदर्शन केले. त्याने अवघ्या 19 चेंडूत आपला अर्धशतक पुर्ण केले. हेडच्या खेळीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला 19.3 षटकांत 179 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंडचा संघ 19.2 षटकांत 151 धावांवर गारद झाला. इंग्लंडचा कार्यवाहक कर्णधार फिलिप सॉल्टने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेडने त्यांचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या सॅम कुरनच्या एका षटकात हेडने कहर केला. या षटकात हेडने 30 धावा दिल्या. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारले. यानंतर त्याने सलग तीन षटकार खेचले आणि शेवटच्या चेंडूवर आणखी चौकार मारून हेडने सॅम कुरनची कारकीर्द जवळपास उद्ध्वस्त केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now