Delhi Arun Jaitley Stadium Bomb Threat: दिल्ली क्रिकेट स्टेडियमवर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी, 'पाकिस्तान'च्या स्लीपर सेलने पाठवला मेल
"तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमचा भारतात एक समर्पित पाकिस्तानी स्लीपर सेल सक्रिय आहे. हा स्फोट ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल," असे मेलमध्ये म्हटले आहे.
Delhi Arun Jaitley Stadium Bomb Threat: दिल्ली क्रिकेट स्टेडियमला बॉम्बची धमकी मिळाली आहे, ज्याची माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशनने (डीडीसीए) दिल्ली पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मेल पाकिस्तान स्लीपर सेलकडून डीडीसीएला आला आहे. हा मेल आज, शुक्रवार, 9 मे रोजी सकाळी 9 वाजता डीडीसीएला पोहोचला आहे. "तुमच्या स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट होईल. आमचा भारतात एक समर्पित पाकिस्तानी स्लीपर सेल सक्रिय आहे. हा स्फोट ऑपरेशन सिंदूरचा बदला असेल," असे मेलमध्ये म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)