IND vs SA 1st Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, दक्षिण आफ्रिकेने 5 गडी गमावून केल्या 256 धावा; डीन एल्गरने झळकावले शतक

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले.

IND vs SA 1st Test: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 66 षटकांत 5 गडी गमावून 256 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे यजमान संघाची आघाडी 11 धावांपर्यंत वाढली आहे. डीन एल्गर 140 धावा करून नाबाद परतला. त्याचवेळी मार्को युनसेन 3 धावा करून क्रीजवर आहे. भारताकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने 2-2 विकेट घेतल्या. याआधी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. (हे देखील वाचा: Sachin Tendulkar On KL Rahul: केएल राहुलच्या शतकावर सचिनने दिली प्रतिक्रिया, कौतुकात सांगितली मोठी गोष्ट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement