Sachin Tendulkar On KL Rahul: केएल राहुलच्या शतकावर सचिनने दिली प्रतिक्रिया, कौतुकात सांगितली मोठी गोष्ट
राहुल फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा 92 धावांपर्यंत भारतीय संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतरही एका टोकाकडून विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली, मात्र राहुलने संघाचा डाव सांभाळत धावा केल्या आणि 101 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.
KL Rahul Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सेंच्युरियन मैदानावर खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलच्या बॅटमधून शानदार शतक झळकले. राहुल फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा 92 धावांपर्यंत भारतीय संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. यानंतरही एका टोकाकडून विकेट्स पडण्याची प्रक्रिया सुरूच राहिली, मात्र राहुलने संघाचा डाव सांभाळत धावा केल्या आणि 101 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 245 धावांपर्यंत मजल मारता आली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ट्विट करून केएल राहुलचे त्याच्या शतकाचे कौतुक केले. (हे देखील वाचा: KL Rahul Century In Centurion: केएल राहुलची ऐतिहासिक खेळी, सेंच्युरियनमध्ये ठोकले शतक; अनेक मोठे रेकॉर्ड तोडले)
Well played @klrahul. What impressed me was his clarity of thought. His footwork looked precise and assured, and that happens when a batter is thinking right. This century is crucial in the context of this Test. India would be happy with 245 considering where they were at one… pic.twitter.com/Dtw9HpjAIC
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2023 08:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

