ICC Cricket World Cup 2023: सराव सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला पोहोचली, अनुभवी गोलंदाज आर अश्विनही दिसला

क्रिकेटच्या महाकुंभासाठी सर्वच संघ खूप उत्सुक आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांमधील ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे.

आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) 5 ऑक्टोबरपासून भारतीय भूमीवर सुरू होत आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी सर्व संघ भारतात पोहोचू लागले आहेत. यावेळी विश्वचषकात 10 संघ सहभागी होत आहेत. क्रिकेटच्या महाकुंभासाठी सर्वच संघ खूप उत्सुक आहेत. या स्पर्धेतील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना 14 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांमधील ही रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळवले जातील. टीम इंडियाचा सामना इंग्लंड क्रिकेट संघाशी 30 सप्टेंबरला पहिला सराव सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथे होणार आहे. भारतीय संघ आपल्या पहिल्या सराव सामन्यासाठी गुरुवारी गुवाहाटी येथे पोहोचला. रोहित शर्मा, विराट कोहलीशिवाय अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनही संघासोबत दिसला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement