IND vs AUS World Cup 2023 Live Score Update: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का, सलामीवीर इशान किशन झाला बाद
भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 2/1