Joginder Sharma Retirement: टी-20 विश्वचषकाचा विजेता जोगिंदर शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा, ट्विट करुन दिली माहिती

जोगिंदर शर्माने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर (Joginder Sharma Retirement) केली आहे.

जोगिंदर शर्मा (Photo Credit: Getty Images)

2007 च्या T20 विश्वचषकाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात जोगिंदर शर्माचे नाव ताजे होते. जोगिंदर शर्मानेच फायनल मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचे ओव्हर टाकून टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले होते. जोगिंदर शर्माने आता क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर (Joginder Sharma Retirement) केली आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आहे. 2007 चा टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा होता. या विश्वचषकानंतर हा खेळाडू टीम इंडियाचा भाग बनला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement