T20 World Cup, BAN vs SL: असलंका-राजपक्षेने बांगलादेशी गोलंदाजांची केली धुलाई, अर्धशतक ठोकून श्रीलंकेला दिली विजयी सुरुवात
श्रीलंकेने रविवारी आयसीसी टी-20 विश्वचषक -2021 सुपर -12 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. बांगलादेशने मोहम्मद नईमच्या 62 आणि मुशफिकर रहीमच्या नाबाद 57 धावांच्या जोरावर 20 षटकांत 4 गडी गमावून 171 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने शानदार फलंदाजी केली आणि 18.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.
श्रीलंकेने (Sri Lanka) रविवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 सुपर -12 च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. बांगलादेशने मोहम्मद नईमच्या 62 आणि मुशफिकर रहीमच्या नाबाद 57 धावांच्या जोरावर 20 षटकांत 4 गडी गमावून 171 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेने शानदार फलंदाजी केली आणि 18.5 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. श्रीलंकेसाठी, चरित असलंकाने (Charith Asalanka) नाबाद 80 आणि भानुका राजपक्षेने (Bhanuka Rajapaksa) 53 धावांची शानदार खेळी करून संघाला विजयी सुरुवात करून दिली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)