IPL 2024 साठी स्वॅप फेरी सुरू, Lucknow Super Giants ने Rajasthan Royals सह प्रमुख खेळाडूंची केली देवाणघेवाण
त्याच वेळी, आयपीएल 2024 लिलावापूर्वी काही संघ त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करत आहेत. आता या यादीत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचीही नावे जोडली गेली आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) नव्या हंगामासाठी लवकरच खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये अनेक नवे चेहरेही पाहायला मिळणार आहेत. आयपीएल फ्रँचायझी काही खेळाडूंवर पैज लावू शकतात जे 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच वेळी, आयपीएल 2024 लिलावापूर्वी काही संघ त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करत आहेत. आता या यादीत लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सचीही नावे जोडली गेली आहेत. या दोन्ही संघांनी आयपीएलच्या नवीन हंगामासाठी प्रत्येकी एक खेळाडू बदलला आहे. बुधवार, 22 नोव्हेंबर रोजी, लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सने आवेश खान आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासाठी सरळ स्वॅप करार केला आहे. त्यानंतर आता आवेश खान आयपीएलच्या नवीन हंगामात राजस्थान रॉयल्सकडून आणि देवदत्त पडिक्कल लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसणार आहे. (हे देखील वाचा: Shami Emotional Post For Mom: विश्वचषकात खळबळ माजवणाऱ्या शमीने आपल्या आईचा फोटो केला शेअर, आपल्या मनातील लिहिल्या भावना)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)