SNO vs VEL, WT20 Challenge 2022: हरमनप्रीतवर भारी शेफाली-Wolvaardt चे अर्धशतक, वेलोसिटीचा सुपरनोव्हासवर 7 गडी राखून दणदणीत विजय

Velocity ने महिला टी-20 चॅलेंजमध्ये विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील वेलोसिटीने सुपरनोव्हासचा 7 गडी राखून पराभव केला. सुपरनोव्हासने दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलोसिटीटी संघाने 10 चेंडू बाकी असताना विजय नोंदवला. लॉरा वॉलवॉर्ट 51 धावांवर नाबाद परतली तर कर्णधार दीप्तीने नाबाद 24 धावा केल्या.

दीप्ती शर्मा आणि लॉरा वोल्वार्ड (Photo Credit: Twitter/IPL)

SNO vs VEL, WT20 Challenge 2022: शेफाली वर्मा (Shafali Verma) आणि लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) अर्धशतकांच्या जोरावर वेलोसिटीने (Velocity) सुपरनोव्हासचा (Supernovas) 7 गडी राखून पराभव केला. यासह दीप्ती शर्माच्या वेलोसिटीने मोहिमेची विजयी सुरुवात केली. लॉरा वोल्वार्ड 51 धावा करून नाबाद राहिली. तर दीप्तीने नाबाद 24 आणि शेफालीने 51 धावांची खेळी केली. दोन सामन्यांतील सुपरनोव्हासचा हा पहिला पराभव आहे. सुपरनोव्हासकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 51 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now