भारतीय दिग्गजचे मोठे भाष्य, पुढील दोन T20 वर्ल्ड कपसाठी कोहलीच्या जागी ‘या’ खेळाडूला लवकर द्या नेतृत्वाची धुरा; Pant-राहुललाही दिली जबाबदारी
आगामी दोन टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल याबाबत भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी खुलासा केला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक 2021 नंतर कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. रोहित शर्माने पुढील टीम इंडियाचे कर्णधारपद स्वीकारावे असे वाटते असे गावसकर यांना वाटते.
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी खुलासा केला आहे की, आगामी दोन टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहायला आवडेल. भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 विश्वचषक 2021 नंतर टी-20 चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. या दरम्यान गावसकर यांना रोहित शर्माने (Rohit Sharma) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे (Team India) कर्णधारपद स्वीकारावे असे वाटते. उपकर्णधारपदासाठी त्यांनी युवा केएल राहुल (KL Rahul) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) यांची निवड केली आहे. गावस्कर म्हणाले की संघ व्यवस्थापन राहुल आणि पंत यांना टी-20 फॉरमॅटमध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त करू शकतात. गावस्कर यांनी असेही सांगितले की, कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली असल्याने रोहित त्याच्या जागी सर्वोत्तम पर्याय आहे. टी-20 विश्वचषक यंदा संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे, तर टी-20 विश्वचषक पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाईल. (Virat Kohli नंतर टीम इंडियाचा T20 कर्णधार कोण बनणार? Rohit Sharma च नाही तर या खेळाडूंमध्येही आहे भरपूर दम)
गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टेडमध्ये टीम इंडियाचा पुढील कर्णधार आणि उपकर्णधार बद्दल बोलले आणि म्हणाले, “माझ्या मते रोहित शर्माने पुढील दोन विश्वचषकांमध्ये कर्णधारपद भूषवावे. कारण दोघेही एकामागून एक आहेत. एक विश्वचषक पुढील महिन्यापासून आणि दुसरा विश्वचषक त्यानंतर एक वर्ष आहे. तर हो मला इतक्या कमी कालावधीत बरेच कर्णधार बदलणे आवडणार नाही. दोन्ही टी-20 वर्ल्ड कपमध्ये, रोहित शर्माला टीम इंडियाचे नेतृत्व केलेले मला आवडेल आणि नंतर मी केएल राहुलला उपकर्णधार म्हणून पाहतो.”
गावस्कर पुढे म्हणाले की , “मी पंतलाही लक्षात ठेवेन, त्याने दिल्ली कॅपिटल्सचे खूप चांगले नेतृत्व केले आहे. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या कर्णधारपदामुळे खूप प्रभावित केले आहे. त्याने कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे सारख्या गोलंदाजांचा खूप मनाने वापर केला आहे, हे दाखवते की तो एक स्ट्रीट स्मार्ट कर्णधार आहे. त्यामुळे मी राहुल आणि पंतला उपकर्णधार म्हणून पाहतो.”
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)