Stuart Broad Viral Video: स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय शेवटच्या सामन्यात ठोकला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला.

Stuart Broad Superb Six: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडचा (Stuart Broad) हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना आहे. दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडने लाँग सिक्सर मारला. स्टुअर्ट ब्रॉडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो शेवटचा चेंडू होता. या षटकारानंतर मैदानात उपस्थित चाहत्यांव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉडच्या कुटुंबीयांना आनंद झाला.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement