SL vs BNG, Asia Cup 2022: श्रीलंकेने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय, सुपर-4 मध्ये जाण्यासाठी होणार अटीतटीची लढत

श्रीलंकेने पहिल्या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाजीने निराश केले, तर डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे बांगलादेशचा पराभव झाला. अ गटात भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करून सुपर-4 साठी पात्र ठरले आहे.

SL vs BNG (Photo Credit - Twitter)

आशिया चषक 2022 मध्ये गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या करा किंवा मरो सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. दोन्ही संघांना ब गटातील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला आहे. दोन विजयांसह सुपर-4 मध्ये पोहोचणारा अफगाणिस्तान हा या गटातील पहिला संघ ठरला आणि आता श्रीलंका आणि बांगलादेश दुसरा संघ बनण्याचा दावा करतील. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात वरच्या फळीतील फलंदाजीने निराश केले, तर डेथ ओव्हर्समध्ये खराब गोलंदाजीमुळे बांगलादेशचा पराभव झाला. अ गटात भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगचा पराभव करून सुपर-4 साठी पात्र ठरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement