SL vs BNG, Asia Cup 2022: रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा 2 विकेट्सने पराभव करत सुपर-4 मध्ये मिळवले स्थान
बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 4 चेंडू राखून दोन विकेट्स राखून सामना जिंकला.
आशिया चषक 2022 स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा दोन गडी राखून पराभव केला. आशिया चषक ब गटात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 4 चेंडू राखून दोन विकेट्स राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने 60 धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने दोन गडी गमावून 48 धावा केल्या. पथुम निसांका 20 आणि चरित अस्लंका 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. 184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. दनुष्का गुनाथिलका 11 आणि राजपक्षे 2 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार शनाका आणि मेंडिस यांच्यात पाचव्या विकेटसाठी 35 चेंडूत 54 धावांची भागीदारी झाली. मेंडिस 37 चेंडूत 60 धावा करून बाद झाला.