SRH vs RCB सामन्यापुर्वी Pat Cummins दिसला तेलुगु बोलताना, केले Pushpa स्टाईलमध्ये सेलिब्रेशन (Watch Video)
पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्समधील प्रोमोसाठी तेलुगुमध्ये बोलताना दिसला. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स तेलगूने शेअर केला आहे.
Pat Cummins Speaks Telegu: पॅट कमिन्स (Pat Cummins) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) सामन्यापूर्वी स्टार स्पोर्ट्समधील प्रोमोसाठी तेलुगुमध्ये बोलताना दिसला. ज्याचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्स तेलगूने शेअर केला आहे. कमिन्स त्याच्या मानेवर हात ठेवतो आणि पुष्प फिल्मच्या सिग्नेचर मूव्ह करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादने तीनदा 250 च्या वर धावा केल्या. यासह हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी 287 धावांची मजल मारली. सध्या हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. (हे देखील वाचा: Hyderabad Beat Delhi: हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी केला पराभव, फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही केली कमाल)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)