IND vs SA 1st Test Day 2 Lunch Break: लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने एक विकेट गमवून केल्या 49 धावा, डीन एल्गर आणि टोनी डी झॉर्झी यांनी सांभाळला डाव

लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने 16 षटकांत एक विकेट गमावून 49 धावा केल्या आहेत. डीन एल्गर 29 आणि टोनी डी झॉर्झी 12 धावा करत खेळत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली. आज दुसऱ्या दिवशी टीम इंडिया पहिल्या डावात आठ विकेट्सवर 208 धावांनी आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव 245 धावांवर संपला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. दरम्यान, लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने 16 षटकांत एक विकेट गमावून 49 धावा केल्या आहेत. डीन एल्गर 29 आणि टोनी डी झॉर्झी 12 धावा करत खेळत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement