SL vs WI, T20 WC 2021: सुपर-12 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा दिमाखदार विजय, वेस्ट इंडिजला पराभूत करून गतविजेत्यांचा विश्वचषकात खेळ खल्लास केला

ICC पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेतील 35 व्या सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा 20 धावांनी पराभव केला. अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 8 गडी गमावून 169 धावा करू शकला. शिमरॉन हेटमायरने संघाकडून नाबाद 81 धावांची खेळी केली. श्रीलंकेचा सुपर-12 मधील अखेरचा सामना होता.

दुष्मंथ चमीरा आणि दसुन शनाका (Photo Credit: PTI)

ICC पुरुष टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेतील 35 व्या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka) वेस्ट इंडिजचा (West Indies( 20 धावांनी पराभव केला. अबु धाबी येथे झालेल्या सामन्यात 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 8 गडी गमावून 169 धावा करू शकला. शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) संघाकडून नाबाद 81 धावांची खेळी केली पण संघाच्या विजयासाठी पुरेशी ठरली नाही. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, वानिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा सुपर-12 मधील अखेरचा सामना होता.

यासह विंडीज संघ सेमीफायनल शर्यतीतुन बाहेर पडला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now