SL vs SA CWC 2023 Toss Update: श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही सघांची प्लेइंग 11
विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने पाच सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे.
विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात आज श्रीलंकेचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. दोन्ही संघांना विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आहे, तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका आहे. विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेने पाच सामने जिंकले आहेत तर श्रीलंकेने एक सामना जिंकला आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शानाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजितहा.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)