Shreyas Iyer Hit-Wicket Out: हार्दिक नंतर आता श्रेयस अय्यर, भारताच्या टी-20 इतिहासातील सर्वात लाजिरवाणा हा विक्रम
अय्यरने 9 चेंडूत केवळ 13 धावा केल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer Hit-Wicket Out) केवळ 13 धावा करता आल्या. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर अय्यरची विकेट पडली. यासह भारताच्या नावावर लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला. टी-20 क्रिकेटमधला भारत हा पहिला संघ बनला आहे, ज्यांच्या खेळाडूंनी सलग 2 सामन्यात हिट विकेट्स घेतल्या आहेत. अय्यरने 9 चेंडूत केवळ 13 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. यासह केएल राहुल, हर्षल पटेल, हार्दिक पंड्या यांच्यानंतर टी-20 क्रिकेटमध्ये हिट विकेट बाद होणारा अय्यर चौथा भारतीय ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)