Shakib Al Hasan Announces Test Retirement: शाकिब अल हसनने बांगलादेशी चाहत्यांना दिला धक्का, कानपूर कसोटीपूर्वी केली निवृत्तीची घोषणा
संघाचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) मोठी घोषणा करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Shakib Al Hasan Retirement) घोषणा केली आहे.
IND vs BAN 2nd Test 2024: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्यापासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. संघाचा दिग्गज खेळाडू शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) मोठी घोषणा करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची (Shakib Al Hasan Retirement) घोषणा केली आहे. मात्र बांगलादेशी चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे शाकिब अल हसनने आपल्या वक्तव्यात भारताविरुद्धच्या कानपूर कसोटीसाठी उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. यानंतर बांगलादेशातील मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल. या सामन्यानंतर तो कसोटी सामने खेळताना दिसणार नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)