IND vs BAN Asia Cup 2023 Live Score Update: अर्धशतक करुन शाकीब अल हसन बाद, बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत

शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करत बांगलादेश पाचवा धक्का लागला आहे.

टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात आज आशिया कप 2023 चा (Asia Cup 2023) शेवटचा सुपर फोर सामना खेळला जात आहे. बांगलादेशचा संघ आधीच या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. यासोबतच टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत त्याचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला आपली बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये 5 बदल करण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करत बांगलादेश पाचवा धक्का लागला आहे. बांगलादेशचा स्कोर 160/5

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement