IND vs AUS 2nd T20 Live Streaming: तिरुअनंतपुरममध्ये होणार आज दुसरा टी-20 सामना, कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह? घ्या जाणून
भारताचा युवा संघ या मालिकेत खेळत असून पहिल्याच सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी आपण कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबरला आज तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. भारताचा युवा संघ या मालिकेत खेळत असून पहिल्याच सामन्यात भारतीय युवा खेळाडूंनी आपण कोणापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना स्पोर्ट्स 18 आणि कलर सिनेप्लेक्स टीव्ही चॅनलवर थेट प्रसारित केला जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर होणार आहे. मोबाईल वापरकर्ते त्यांच्या जिओ नंबरसह जिओ सिनेमा वेबसाइटवर लॉग इन करून त्याच्या अॅपवर आणि लॅपटॉपवर थेट सामन्याचा आनंद घेऊ शकतात. (हे देखील वाचा: वनडे, टी-20 आणि कसोटीत असू शकतात तीन नवे कर्णधार, BCCI घेऊ शकते मोठा निर्णय!)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)