IND vs BAN 1st Test 2022 Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, बांगलादेशची धावसंख्या 133/8, भारताकडे 271 धावांची आघाडी
बांगलादेशच्या दोन विकेट शिल्लक आहेत. एकदिवसीय मालिकेत शानदार फलंदाजी करणारे मेहदी हसन मिराज आणि इबादत हसन क्रीजवर आहेत.
IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असुन या सामन्यात भारताने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. भारताकडून चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि अश्विन यांनी अर्धशतकी खेळी खेळली. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 133 धावांवर आठ गडी गमावून संघर्ष करत आहे. भारताकडे 271 धावांची आघाडी आहे. सामन्याला तीन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. बांगलादेशच्या दोन विकेट शिल्लक आहेत. एकदिवसीय मालिकेत शानदार फलंदाजी करणारे मेहदी हसन मिराज आणि इबादत हसन क्रीजवर आहेत. या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली असून तिसऱ्या दिवशी ही जोडी आपल्या संघाला फॉलोऑनपासून वाचवण्याचा प्रयत्न करेल. भारताकडून कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी शानदार गोलंदाजी केली. कुलदीपने चार आणि सिराजने तीन गडी बाद केले. उमेश यादवला एक विकेट मिळाली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)