Ahmedabad: भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यान बनावट तिकिटांची विक्री, अहमदाबाद गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक (Watch Video)

नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकांची खचाखच गर्दी होणार आहे. तसेच या सामन्याच्यादरम्यान तिकीटाची बोंब आहे. क्रिकेट चाहते दुप्पट तिप्पट किंमत मोजून तिकीट खरेदी करण्यासाठी तयार आहेत.

Arrested | (File Image)

विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत - पाकिस्तान सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून हा सामना दोन्ही संघ खेळणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना हा बहुधा क्रिकेटमधील सर्वाधिक चर्चेचा सामना आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी प्रेक्षकांची खचाखच गर्दी होणार आहे. तसेच या सामन्याच्यादरम्यान तिकीटाची बोंब आहे. क्रिकेट चाहते दुप्पट तिप्पट किंमत मोजून तिकीट खरेदी करण्यासाठी तयार आहेत. आणि याचाच फायदा घेतल बनावट तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. अहमदाबाद गुन्हे शाखेकडून बनावट तिकिट प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जैमिन प्रजापती हा मुख्य आरोपी आहे. त्याने कुश मीना आणि राजवीर ठाकूर झयांच्यासोबत बनावट तिकिटे छापली आहेत. पोलिसांकडे 150 बनवाट तिकिटे हस्तगत झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement