Sachin Tendulkar On IPL Final: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याकडून चैन्नई संघाचे अभिनंदन, गुजरातच्या खेळाडूंनाही कौतुकाची थाप
आयपीएलच्या सर्वात रोमांचक सिझन पैकी हा एक सिझन असल्याचे सचिनने म्हटले आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला. चेन्नईनं (Chennai Super Kings) पाचव्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यासोबतच चेन्नई (CSK) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा (Mumbai Indians) दुसरा संघ बनला आहे. या विजयानंतर मास्चर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) चैन्नईच्या संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच त्याने गुजरातच्या खेलाडूंच्या खेळाचे देखील कौतुक केले आहे. आयपीएलच्या सर्वात रोमांचक सिझन पैकी हा एक सिझन असल्याचे देखील सचिनने म्हटले आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)