Sachin Tendulkar Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र दिनानिमित्त क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मराठीमधून दिल्या खास शुभेच्छा, See Post

भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मराठीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे.

Sachin Tendulkar (Photo Credit - Twitter)

Sachin Tendulkar Maharashtra Day 2024 Wishes: महाराष्ट्र राज्य आज आपला 65 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक लोकांचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. या दिनाचे औचित्य साधत मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. आता भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर महाराष्ट्र दिनाच्या या शुभ प्रसंगी चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने मराठीमध्ये ही पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणतो, ‘आपली परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा सार्थ अभिमान बाळगून आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करूया. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!’ (हेही वाचा: Maharashtra Din Wishes: पीएम नरेंद्र मोदी, सीएम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्या महाराष्ट्र स्थापना दिनाच्या शुभेच्छा, See Posts)

पहा पोस्ट- 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement