Sachin Tendulkar 50th Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ला शीर्षासन करत Virender Sehwag च्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा (Watch Video)

वीरेंद्र सेहवाग याने आज सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चक्क शीर्षासन केलं आहे.

Sachin Tendulkar | (Photo Credits: Face Book)

क्रिकेटचा देव अशी ओळख असणार्‍या सचिन तेंडुलकरचा आज 50 वा वाढदिवस आहे. त्याच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण त्याचा ऑनफिल्ड आणि ड्रेसिंग रूम मधील जुना साथीदार वीरेंद्र सेहवाग याने आज सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चक्क शीर्षासन केलं आहे. अशा हटके अंदाजात शुभेच्छा देण्यामागील कारणही त्याने व्हिडिओ शेअर करत सांगितलं आहे. 'ऑन फिल्ड तुम्ही जे सांगितलं त्याच्या उलटचं केलं मग तुम्हांला आज शुभेच्छा शीर्षासनामध्येच देतो' असं सेहवाग व्हिडिओ मध्ये म्हणाला आहे.

पहा वीरेंद्र सेहवागचा हटके अंदाजातील व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now