Sachin React To Virat Kohli 50th Century: विराटच्या 50व्या शतकावर सचिनची प्रतिक्रिया, विक्रम मोडल्याबद्दल 15 वर्ष जुनी गोष्ट सांगितली
विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यावर आता सचिन तेंडुलकरने ट्विट करत विराटच्या 50व्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे.
इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) न्युझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी करत अवघ्या 106 चेंडूत वनडेतील 50 वे शतक पूर्ण केले. विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यावर आता सचिन तेंडुलकरने ट्विट करत विराटच्या 50व्या शतकावर प्रतिक्रिया दिली आहे तसेच विक्रम मोडल्याबद्दल 15 वर्ष जुनी गोष्ट सांगितली. सचिन तेंडुलकरने त्याच्या एक्स हँडलवर विराटच्या शतकावर एक पोस्ट टाकली आणि लिहिले, 'जेव्हा मी तुला पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भेटलो, तेव्हा तू माझ्या पायांना स्पर्श केलास आणि सर्वांनी मजा घेतली. मलाही हसू आवरता आले नाही. पण नंतर तू तुझ्या उत्कटतेने आणि तुझ्या कौशल्याने माझ्या हृदयाला स्पर्श केलास. एक तरुण मुलगा विराट आज एक खेळाडू म्हणून जगासमोर आहे याचा मला आनंद आहे. एका भारतीयाने माझा विक्रम मोडला यापेक्षा मी आनंदी होऊ शकत नाही. विशेष म्हणजे माझ्या घरच्या मैदानावर, विश्वचषक उपांत्य फेरीच्या एवढ्या मोठ्या मंचावर हे घडले.' (हे देखील वाचा: Virat Flying Kiss To Anushka: विराट कोहलीने 50 वे शतक झळकावल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडिओ)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)