Virat Flying Kiss To Anushka: विराट कोहलीने 50 वे शतक झळकावल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडिओ

विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Virat Flying Kiss To Anushka: विराट कोहलीने 50 वे शतक झळकावल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने दिले फ्लाइंग किस, पाहा व्हिडिओ

आज टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 चा पहिला सेमीफायनल सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत अवघ्या 106 चेंडूत वनडेतील 50 वे शतक पूर्ण केले. विश्वचषकातील तिसरे शतक झळकावण्याबरोबरच विराट कोहलीने महान सचिन तेंडुलकरचा वनडेतील 49 शतकांचा विक्रमही मागे टाकला. त्याने 106 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार ठोकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने शतक झळकावताच त्याची पत्नी अनुष्का शर्मा उभी राहिली आणि त्याला फ्लाइंग किस दिला, त्यानंतर कोहलीनेही तिला त्याच पद्धतीने उत्तर दिले, ज्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2023 05:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).