Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Mehandi Ceremony: पार पडला ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा मेहंदी सोहळा; 3 जून रोजी अडकणार विवाहबंधनात
आज ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहेत.
नुकतेच झालेल्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघासाठी चमकदार कामगिरी केली. आता ऋतुराज त्याच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत 3 जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. उत्कर्षा स्वतः एक क्रिकेटर आहे. आज ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहेत.
ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजचा आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम स्कोअर 92 होता. (हेही वाचा: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; लवकरच मिळणार डिस्चार्ज)
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2023 09:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

