RR vs RCB, IPL 2022 Qualifier-2: राजस्थानची जबरा गोलंदाज; बेंगलोरची 157/8 धावांपर्यंत मजल, रजत पाटीदारचे अर्धशतक ठरले लक्षवेधी

अशाप्रकारे राजस्थानला सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 158 धावांचे आव्हान मिळाले आहे. आरसीबीसाठी रजत पाटीदारने सर्वाधिक 58 धावा केल्या.

रजत पाटीदार (Photo Credit: PTI)

RR vs RCB, IPL 2022 Qualifier 2: आयपीएल (IPL) 2022 च्या क्वालिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) जबरा गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 षटकांत 157 धावांपर्यंत रोखले. आरसीबीसाठी रजत पाटीदारने (Rajat Patidar) पुन्हा शानदार जबरदस्त फलंदाजी केली सलग दुसरे अर्धशतक ठोकले. पाटीदारने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर फाफ डु प्लेसिसने 25 आणि ग्लेन मॅक्सवेलने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानकडून प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) आणि ओबेद मॅकॉयने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. तर ट्रेंट बोल्ट व आर अश्विनने 1-1 गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)