RR vs KKR IPL 2021 Match 18: Chris Morris याचा कोलकातावर हल्लाबोल, राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य

कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 36 धावांचे योगदान दिले.

राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: Twitter/@IPL)

RR vs KKR IPL 2021 Match 18: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 18 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 133 धावांपर्यंत मजल मारली आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला विजयासाठी 134 धावांचे लक्ष दिलं आहे. कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) 36 तर नितीश राणाने 22 धावा आणि दिनेश कार्तिकने 25 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, राजस्थानच्या गोलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेत कोलकाता संघावर सुरुवातीपासून दबाव आणला होता. रॉयल्सचा महागडा क्रिस मॉरिसने (Chris Moriss) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर जयदेव उनाडकट, चेतन सकारिया आणि मुस्ताफिजूर रहमान यांनी प्रत्येकी 1 घेतली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)